नागपूरमध्ये जमावाने गुंडाला दगडाने ठेचून मारले

January 22, 2014 7:09 PM1 commentViews: 5206

3445 nagpur crime news22 जानेवारी : नागपूरमध्ये पुन्हा एकदा एका गुंडाला संतप्त जमावाने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नागपूरजवळच्या कन्हान इथं मोहनीश रेड्डी या गुंडाचा पन्नास ते साठ जणांनी दगडाने ठेचून खून केलाय. या हल्ल्यात मोहनीशचा भाऊ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या परिवारातील चार महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत.

मोहनीश रेड्डी याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. मोहनीश याला तडीपारही करण्यात आलं होतं. मोहनीश हा सत्तरपूर लेबर कॅम्प मधला रहिवासी होता. घुमांटू समाजातील काही लोकांसोबत मोहनीशचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचाच राग मनात ठेवून 40 ते 50 लोकांनी बुधवारी सकाळी मोहनीशला घरी गाठलं.

त्यांनी मोहनीशला काठ्यांनी मारलं, घराबाहेर खेचून आणलं आणि दगडाने ठेचून ठार केलंय. याचवेळी मोहनीशचा भाऊ मोहनीश आणि त्याची पत्नी निलिमा, बहीण रिना, धनलक्ष्मी आणि आई उशा रेड्डी यांनाही मारहाण करण्यात आली यात सर्वजण गंभीर जखमी झाले आहे. मोहनीशने आपला बचाव करण्यासाठी आपल्या देशीकट्‌ट्यातून फायरिंगही केलं. पण संतप्त जमावाने आपला इरादा साधत मोहनीशचा जीव घेऊनच दम सोडला. यासंदर्भात कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही हल्ला करणार्‍यांचा पोलीस शोध घेत आहे.

नागपूरमध्ये याआधीही लोकांनी गुंडांचा खून करण्याच्या घटना घडल्या आहेत

  • - 13 ऑगस्ट 2004  – अक्कू यादवचा भर न्यायालयात खून
  • - 14 ऑक्टोबर 2004  – नईम आणि फईम या दोन भावांचा खरबी इथं खून
  • - 9 ऑक्टोबर 2012 – भुर्‍या या गुंडाचा वसंतराव नाईक झोपडपट्टीत खून
  • - 22 जून 2013  – तकिया भागात शेख इस्माईल रज्जाकचा 10-12 जणांनी केला खून
  • - 4 डिसेंबर 2013- अक्कू यादवच्या पुतण्याचा खून
  • Abhijit Buchake

    tyane deshi kattyatun goli chalavli nasti tar lokanni tyala kadachit thechle naste…..pan mulat gundigiri karaychich kashala???

close