माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांना 3 वर्षाची शिक्षा

February 25, 2009 11:31 AM0 commentsViews: 1

25 फेब्रुवारीमाजी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना न्यायालयानं 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता गोळा केल्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांना 2 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. मात्र न्यायालयानं सुखराम यांना लगेचच 50 हजाराच्या बॉडवर अंतरिम जामीन दिला आहे. 23 एप्रिलपर्यंत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. असं असलं तरी या दरम्यान सुखराम यांना परदेशात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

close