2005 पूर्वीच्या नोटा चलनातून होणार बाद – आरबीआय

January 23, 2014 9:59 AM0 commentsViews: 1126

currency copy23 जानेवारी :  2005 पूर्वीच्या चलनात आणलेल्या सर्व नोटा येत्या 31 मार्चनंतर चलनातून काढून घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केला. 1 एप्रिल 2014 पासून जुन्या नोटा बदलून देण्याची सोय सर्व बँकांमधून केली जाणार आहे. काळा पैसा आणि बोगस नोटांवर निर्बंध घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतलाय.

या घोषणेमुळे सर्वसामान्यांत खळबळ उडाण्याची शक्यता आहे, पण त्यांनी घाबरून न जाता या प्रक्रियेत सहकार्य करण्याची विनंती आरबीआयने केली आहे.

2005 नंतरच्या नोटांत्या मागे खालच्या बाजूला ती छापली गेल्याल्या वर्षाची नोंद केली आहे. त्यामुळे ज्या नोटांच्या मगे वर्ष छापलेलं नसेल ती 2005च्या पूर्वीच्या नोटा ओळखणं सहज शक्य आहे.

काळा पैसा येईल बाहेर…
500 ते 1000 रुपयांच्या दहा पेक्षा जास्त नोटा बदलून घेताना त्या व्यक्तीला आपलं ओळखपत्रं (पॅन कार्ड) आणि निवासाचा पुरावा सादर करावं लागणार आहे. त्यामुळे बँकेत काळा पैसा दडवून ठेवणार्‍यांची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे.

close