पिस्तूल घेऊन काँग्रेसचा नगरसेवक महापालिकेत

February 25, 2009 2:10 PM0 commentsViews: 5

25 फेब्रुवारी मुंबईमुंबई महापालिकेच्या सभागृहात आज काँग्रेसचा नगरसेवक पिस्तूल घेऊन आढळून आला. बबलू अझिज असं त्या नगरसेवकाचं नाव आहे. महापालिकेच्या सभागृहात शस्त्र बाळगून प्रवेश करायला बंदी आहे. पण हा नियम धाब्यावर बसवत बबलू अझिज या नगरसेवकानं सभागृहात पिस्तूल नेलं. या बाबत अझिज यांना विचारलं असता, माझ्याजवळ चार वर्षांपासून स्वत:च पिस्तूल आहे. आणि त्याचं लायसन्स देखील माझ्याकडे आहे. पण मी सभागृहात पिस्तूल नेत नाही असं त्यांनी सांगितलं. या घटनेबद्दल इतर नगरसेवकांच्या लक्षात आणून दिलं असता सभागृहात पिस्तूल नेणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

close