मोदींबद्दल प्रश्न विचारला शंकराचार्यांनी लगावली थप्पड

January 23, 2014 2:24 PM0 commentsViews: 2461

shankarchrya 4323 जानेवारी : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि साधु संतांचं तसं जवळचं नातं आहे. मात्र द्वारिका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  यांना आज (गुरुवारी) जेव्हा नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा शंकराचार्यांचा पारा चढला आणि त्यांना प्रश्न विचारणार्‍या पत्रकारालाच थप्पड लगावली.

कॅमेरा ऑन होता म्हणून शकराचार्यांचे रौद्ररुप कॅमेर्‍यात कैद झाले. लोक मोदींना चर्चेत ठेवण्यासाठीच असे प्रश्न विचारत असतात, म्हणून मी पत्रकाराला थप्पड लगावली असं स्पष्टीकरण देत शंकराचार्यांनी आपल्या कृतीचं समर्थनही केलं. एवढंच नाहीतर मला राजकारण्यांविषयी काही विचारत जाऊ नका असा दमही त्यांनी भरला.

शंकराचार्यांच्या पराक्रमाचा भाजपच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केलाय. या प्रकारामुळे शंकराचार्यांचा खरा चेहरासमोर आलाय अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते प्रल्हाद पटेल यांनी दिली. स्वरुपानंद हे काँग्रेसबद्दल सहानुभूती असलेले शंकराचार्य असल्याचं मानलं जातंय त्यामुळे आता स्थितप्रज्ञ आणि निरपेक्ष वृत्तीने समाजाकडे बघणार्‍या संतामध्येही राजकारण सुरू झालं का अशी चर्चा आता सुरू झालीय. विशेष म्हणजे या अगोदरही अनेक वेळा राजकीय घडामोडीबद्दल शंकराचार्य यांना प्रश्न विचारले मात्र त्यांनी त्यांची वादग्रस्त उत्तर दिली.

close