अमेरिकेची अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल- ओबामा

February 25, 2009 2:27 PM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. या भाषणात अर्थव्यवस्थेला पुन्हा मजबूत बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मार्केट्समध्ये चलनपुरवठा वाढवण्यासाठी नव्या स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा करण्याची शक्यताही ओबामांनी बोलून दाखवली.आर्थिक संकटांच्या या काळात बँकिंग सेक्टरकडूनच पाठिंबा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. उर्जा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांना बळकट करणं हे देशासमोरचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं ओबामांनी सांगितलंय. दरम्यान अमेरिकेची अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल असा विश्वास ओबामांनी व्यक्त केलाय. सरकारी अधिका-यांकडून पै न पैचा हिशेब घेतला जाईल असंही त्यांनी बजावलं. मात्र त्याचबरोबर आऊटसोर्सिंग करणा-या कंपन्यांसाठी करसवलती काढून घेतल्या जातील असा ही इशारा त्यांनी दिलाय.

close