राहुल गांधी विदर्भ दौर्‍यावर

January 24, 2014 2:53 PM0 commentsViews: 127

Image rahul_gandhi345234_300x255.jpg24 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. आज दुपारी ते वर्ध्यात दाखल झाले असून बापू कुटीला भेट देणार आहेत. यानंतर सेवाग्राममध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. राहुल यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये आश्रमाला भेट दिली होती.

त्यावेळी सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना फक्त पाच मिनिटं आश्रमात थांबण्याची परवानगी होती, तरीही त्यांनी आश्रमात तब्बल पंचवीस मिनिटे घालवली आणि बारकाईने आश्रमाची माहिती जाणून घेतली होती. बापूंच्या आश्रमातील प्रार्थनेसोबतच नई तालिम शाळेच्या चिमुकल्यांसोबत संवाद साधला होता.

काँग्रेस पक्षाचा लोकसभा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी 2009 मध्ये राहुल गांधी वर्ध्यात आले होते. आताही ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांसोबत विचारमंथन करण्यासाठी येत आहेत.

close