ए.आर. रेहमानसह ऑस्करवीर भारतात परतले

February 26, 2009 5:21 AM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी आपल्या जादूई संगीताने ऑस्कर पटकावणारा ए.आर.रेहमान पहाटे चेन्नईला परतला. विमानतळावर पोहचताच मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांनी त्याला गराडा घातला. ऑस्करच्या ट्रॉफी सांभाळत, तसंच सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत तो मार्ग काढत होता. यावेळी विमानतळावर अभिनंदन करण्यासाठी त्याचे अनेक मित्रही आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रेहमाननं आपल्या चाहत्याचे आभार मानले. विमानतळावर झालेल्या स्वागतानं रेहमान भारावून गेला होता. तसंच रसुल पुकुट्टी आणि स्लमडॉग मिलेनिअरमधील अभिनेता इरफान खान हे दोघे पहाटे मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर त्यांच भव्य स्वागत करण्यात आलं. स्लमडॉग मिलेनियरच्या साऊंड मिक्सींगसाठी रसुल पुकुट्टीला ऑस्कर मिळालं आहे. भारतात परतल्यानंतर ते बरेच उत्साहीत होते. विमानतळावर त्यांनी आपला आनंद मीडियाशी शेअर केला.रेहमान आणि रसुल पुकुट्टी यांची मुलाखत पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close