संजय काकडेंची पुन्हा ‘सातवीची परीक्षा’ !

January 24, 2014 6:32 PM0 commentsViews: 1393

sanjay kakde24 जानेवारी : राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरली आहे. पण राज्यसभेच्या सातव्या जागेसाठीच खरी चुरस आहे. या सातव्या जागेवर डोळा ठेवून पुण्यातले बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज भरला. राज्यसभेची सातवी जागा पटकावण्यासाठी संजय काकडे पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलेत. 485 कोटी रुपयांची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवणारे संजय काकडे यांचा वावर कायम राजकीय वर्तुळात राहिलाय.

शिवसेनेच्या दोन जागा निवृत्त होत आहेत. पण, अपुर्‍या संख्याबळामुळे शिवसेनेची दुसरी जागा निघत नाही. त्यामुळे सातव्या जागेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून जो मतांची बेगमी करेल, तो उमेदवार निवडणूक येणार आहे.

राज्यसभेच्या खासदारकीसाठी संजय काकडे यांनी गेल्या 3 वर्षांपासून तयारी चालवलीय. त्यामुळेच आपल्याला 18 अपक्ष आमदारांचा आणि इतर छोट्यामोठ्या पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा काकडे करत आहे. अपक्षांबरोबरच सेना-भाजपची मतं मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

कोण आहेत संजय काकडे ?

  • संजय काकडे – राज्यसभेचे अपक्ष उमेदवार
  • - सातवी पास असलेले संजय काकडे पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
  • - काकडेंच्या 34 कंपन्या, अनेक मोठे प्रकल्प
  • - अजित पवारांचे जुने सहकारी
  • - शरद पवारांशीही सलगी
  • - भाजप, शिवसेनेशीही जवळीक
  • - सर्वपक्षिय नेत्यांशी सलोख्याचे संबंध
  • - व्यावसायिक वजन वाढवण्याचा प्रयत्न
  • - काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे बहुतेक अपक्ष आमदार काकडेंच्या दिमतीला
  • - इतर छोट्यामोठ्या पक्षांचे आमदारही काकडेंच्या संपर्कात

 

close