बारावीच्या परीक्षांना सुरुवात

February 26, 2009 5:36 AM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी राज्यात बोर्डाच्या 12 वीच्या लेखी परीक्षांना आजपासून सुरूवात होत आहे. राज्यभरातून सगळ्या शाखेचे मिळून एकूण 11 लाख 84 हजार 226 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. त्यात कला शाखेत 5 लाख 16 हजार 76, सायन्समधून 3 लाख 10 हजार 28 आणि कॉमर्स शाखेतून 2 लाख 93 हजार 85 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. तसंच एमसीवीसीला 63 हजार 337 तर माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी 56 हजार 823 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. राज्यभरात एकूण 1830 परीक्षेची केंद्र आहेत. बोर्डाच्या या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 245 भरारी पथकंही नेमण्यात आली आहेत. 21 मार्चपर्यंत ही परिक्षा चालणार आहे. पुढल्या वर्षीपासून एमसीवीसी ची परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. त्यामुळे जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल.

close