तिसर्‍या(वन डे)त वाचलो, भारताचे आव्हान कायम

January 25, 2014 3:46 PM0 commentsViews: 1449

jadeja25 जानेवारी : सलग दोन वनडे मॅचमध्ये पराभवानंतर अखेर तिसर्‍या वन डेत भारताच्या डुबत्या जहाजाला सहारा मिळालाय. ऑकलंड तिसरी वन डे टाय झालीये.

रविंद्र जडेजाच्या तुफान बॅटिंगच्या जोरावर भारतानं पराभवाच्या छायेतून उसळी मारत ही वन डे वाचवली आहे आणि त्याचबरोबर मालिकेतील टीम इंडियाचं आव्हानंही कायम राहिलंय. टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय टीम इंडियाला पुन्हा महागात पडलाय.

पहिली बॅटिंग करणार्‍या न्यूझीलंडनं मार्टिन ग्युप्टिलच्या तुफानी सेंच्युरीच्या जोरावर भारतासमोर 315 रन्सचं विशाल टार्गेट ठेवलं. ग्युप्टिलनं 111 रन्स केले. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरुवात तर चांगली झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवननं आज भारताला चांगली सुरुवात तर करुन दिली. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनी मात्र निराशा केली. रैनाही फटकेबाजीच्या नादात आऊट झाला.

तर दरवेळप्रमाणे कॅप्टन धोणीने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तोही हाफ सेंच्युरी ठोकून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला चांगली साथ दिली ती आर अश्विननं. पण अश्विनंही 65 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर भारताच्या शेवटच्या विकेट झटपट पडल्या. पण रविंद्र जडेजाच्या तुफान फटकेबाजी करत 66 रन्स ठोकले. जडेजाच्या या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने ही वन डे टाय केली.

close