वीज दरासाठी निरुपम यांचा आत्मदहनाचा इशारा

January 25, 2014 2:27 PM2 commentsViews: 451

sanjay nirupam fast25 जानेवारी : रिलायन्सनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्मदहन करू असा इशारा काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी दिलाय. वीजदर कमी करण्याच्या मागणीसाठी निरुपम मुंबईत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.

रिलायन्स पॉवर या वीज वितरक कंपनीनं वीजदर कमी करावेत, अशी त्यांची मागणी आहे. कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, वीजदर कमी करण्याबाबत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

विशेष म्हणजे दिल्ली प्रमाणे राज्यातही वीज दरात कपात व्हावी अशी मागणी निरुपम यांनी सुरुवातीला केली होती. राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यात 20 टक्के वीज दर कपात केलीय. मुंबईच्या वीजेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण पक्षाला घरचा अहेर देत संजय निरुपम उपोषणाला बसले. निरुपम यांच्या उपोषणाची पक्षाकडून दखल तर घेतली जात नाही पण पाठराखणही होईना.

त्यामुळे विरोधकांनी तब्येतीची काळजी घ्या असं सांगत खिल्ली उडवलीय आता निरुपम यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. मात्र इथंही अजित पवारांनी बुधवारी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे निरुपम उपोषण मागे घेतात का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 • kamlakar pawar

  निरूपमांचे ‘निरुपण’….. !

  काँग्रेसचे
  उत्तर मुंबईतील लोकसभेचे खासदार संजय
  निरुपम यांनी अचानकपणे महाराष्ट्राचे
  मुख्यमंत्री श्री पृथ्वी
  राज चव्हाण यांना
  पत्र पाठवून राज्यातील विजेचे दर
  ताबडतोब कमी करा किंबहुना
  ते ५० टक्क्यावर
  आणा अन्यथा
  सरकारविरोधी जनतेचे
  आंदोलन उभे करू असा
  चक्क इशारा दिल्यामुळे काही
  दिवसांपूर्वी रिलायंस च्या
  कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर आता
  तर दस्तुरखुद्द निरुपम
  यांनी वीज दर
  कमी न झाल्यास
  आत्मदहन
  करण्याचा इशाराच देऊन आपल्यास
  सरकारला कठीण राजकीय
  परिस्थितीत आणखीच अडचणीत आणले
  आहे त्यामुळे राजकीय
  वर्तुळात चवीने
  चर्चा होत आहे
  .

  दिल्लीत
  नुकतेच झालेले राजकीय बदल
  आणि त्याचा राजकीय
  नेत्यांनी घेतलेला धसका पाहता
  देशभर एका बाजूने
  नमो ची लाट
  तर दुसरीकडे अरविंद
  ची पहाट याचा
  ताळमेळ कसा घालायचा
  या विवंचनेत सारेजण
  असल्यामुळेच संजय
  निरुपम हे त्याला
  अपवाद ठरले असते तरच
  नवल ! आणि त्यानुसारच देशभरात
  सुरु असलेल्या राजकीय
  घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि
  विविध राजकीय सर्वेक्षणे
  समोर येत असतानाच आता
  मार्ग माझा एकला
  म्हणत राजकीय सहानुभूती
  मिळविण्यासाठीच हा खटाटोप
  सुरु झाला आहे
  असे म्हटल्यास वावगे
  ठरणार नाही त्याला करणेही अनेक
  आहेत .

  संजय निरुपम यांचा व्यावसायिक आणि राजकीय इतिहास पाहता सुरवातीला पाटण्या तून आलेल्या निरुपम यांनी १९८६ साली दिल्लीत पत्रकारितेला सुरवात केली आणि त्यानंतर १९८८ साली इंडियन एक्स्प्रेस समूहामध्ये काम करण्यासाठी मुंबईत दाखल झाले तेथेही काही काळ काम केल्यानंतर ते थेट बाळ ठाकरे यांच्या दैनिक हिंदी सामना मध्ये संपादक म्हणून रुजू झाले .त्या वेळी प्रांतवाद विरोधी बाळ ठाकरे यांच्या भूमिकेचेही जी भूमिका आज त्यांना पटत नाही तिचेही जोरदार समर्थन केले दिल्ली दरबारी उत्तर भारतीय नेत्यांशी संवाद साधण्यासाठी हेच बिहारी बाबू उपयोगी पडतील म्हणून उदार अंतकरणाने ठाकरे यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यसभेत पाठविले सामानाचा संपादक हा नेहमीच खासदार होतो हा आता पायंडा पडत चालला आहे ,कारण निरुपम यांच्या नंतर संजय राउत यानाही अशीच बक्षिशी मिळाली आहे . यु .टि . आय , स्टोक मार्केट , घोटाळा , खाजगीकरण ,नक्षलवाद , वैशविकिकरन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या , घरगुती उद्योग आदि विषयांवर त्यांनी एन
  .डि .ए सरकारच्या काळात संसदेत आवाज उठविला पण मग माशी शिंकली च शेवटी आणि शिवसेनेत प्रांतवाद पुन्हा उफाळून आला आणि मग निरुपम यांनी बाळ ठाकरे आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत कोन्ग्रेस चा पदर पकडला . सुरवातीस महाराष्ट्र कोन्ग्रेस चे प्रवक्ते त्यानंतर सरचिटणीस आणि मग गोवा, गुजरात आणि नागा ल्यंड साठीचे राजकीय निरीक्षक अशी भूमिका बजावल्यानंतर शेवटी कोन्ग्रेस कडून मागील दोन टर्म राज्यसभा आणि आणि १ टर्म लोकसभा अशी सलग १५/१६ वर्षे राजकीय बक्षिशी मिळवण्यात निरुपम यशस्वी ठरले सध्या अखिल भारतीय कोन्ग्रेस चे सरचिटणीस आणि मध्यप्रदेश चे प्रभारी असा पक्ष प्रभार हि सोबत आहेच . आता खरा प्रश्न पडतो तो हा कि सन १९८६ ते सन २०१४ या २८ ते ३० वर्षांत विविध क्षेत्रात काम केलेल्या निरुपम यांना आताच घाईघाईने सरकारला वीज बिल कमी करण्याबाबत वेठीस धरण्याची उपरती का लागावी ?

  दिल्लीतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा असेल तर ठीक पण लोकसभा आणि तीही आता मुंबई तून जिंकणे जिकीरीचे असल्यामुळेच दिल्ली फॉर्म्युला वापरून तर पाहावा म्हणून त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे जर असे नसते तर दिल्ली दरबारी थेट सोनिया गांधी किवा राहुल गांधी यांचेशी संधान साधून आदर्श प्रकरणी जसे आदेश निघाले तसे आदेश काढून घेता आले असते पण राजकीय लाभ आणि प्रसिद्धी घेत आली नाही तर ते निरुपम म्हणताच येणार नाहीत म्हणून मग पत्र , आंदोलन आणि आता आमरण उपोषण आणि आत्मदहन अशी क्लुप्ती लढविण्यात आली आहे शिवाय यात आणखी एक गम्मत अशी कि ज्या विजेचे दर ५० टक्क्यांवर आणले जावेत असे निरुपम यांना वाटते ते उर्जा खाते नेमके त्यांच्या पक्षाकडे नाही हे माहित असल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ला
  जनहिताच्या कात्रीत अडकविणे
  हा निरुपम यांचा दुसरा फंडा आहे ज्यामुळे पक्ष श्रेष्ठींची सहानुभूती मिळेल आणि पुढील काळात काहीतरी पदरात पडेल या आशेवरच हा सगळा खटाटोप आहे

  ३० वर्षात संबंध देश फिरताना आणि महाराष्ट्र फिरताना विजेचे वाढते दर निरुपम यांना दिसलेच नाहीत ते थेट केजरीवाल यांनी वीज जोडण्या जोडून दिल्याच्या चित्रफिती पाहिल्यानंतर एकदम लक्षात आले क़ेजरिवाल यांचे सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहे आपण त्याचा सन्मान करायला हवा पण लोकशाहीच्या नावावर केवळ आपल्या मुलभूत हक्कांची मागणी करताना भारतीय घटनेने नागरिकांना सांगितलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांचेही भान त्यांनी ठेवायला हवे केवळ प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन कोणताही आततायी निर्णय आता केजरीवाल यांना घेता येणार नाही कारण ते आता एका घटनात्मक पदावर आहेत आणि केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केजरीवाल नेमके हेच विसरत आहेत तर घटनेचा आटापिटा करून सांगणारे कॉंग्रेस आणि त्यांचे खासदार संजय निरुपम हे ५० टक्के वीज बिल माफी महाराष्ट्राला शक्य आहे का ? याचा कोणताही प्रस्ताव सरकारला न देता कोणतीही चर्चा न करता थेट आंदोलनासाठी उतरून आत्मदहन करण्याची धमकी देत आहेत हे हि तितकेच असंवैधानिक आहे ,

  वीज बिल माफी मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे पण आज मुंबई सोडली तर महाराष्ट्रातील इतर शहरे आणि सर्व खेडी
  या ठिकाणी विजेचा असलेला तुटवडा आणि भारनियमन
  तसेच त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास त्याचे परिणाम
  वय जाणारा वेळ , रखाडणारी कामे , बुडणारा
  अभ्यास ,कमी होत असलेली उत्पादन क्षमता वाया जाणारी क्रयशक्ती हे त्या
  वीज बिल माफी पेक्षाही त्रासदायी आहे
  हे निरुपम यांना काळात नाही का जखम जिथे आहे
  तिथे मलम लावायचा सोडून भलत्याच मागण्या करून सवंग प्रसिद्धी स्टंट लोकांनाही काळात असतात उत्तम सेवा
  द्यायचे सोडून सेवा ज्या सेवा मिळत
  नाहीत त्यांच्या कर आकारणीत माफी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा नव्हेत काय?

  नव्याचे नऊ दिवस असतात हे म्हणतात न ते खरेच आहे दिल्ली सरकारचे आता फक्त तीन तेरा वाजायचे बाकी आहेत उगाचच नको ते अनुकरण करण्याच्या नादात आहे ते हि गमावून बसाल हे लक्षात ठेवा .

 • mutlaq abraham

  Songadya Kuthla…….

close