पिंपरीत मनसेच्या कार्यकर्त्याचा खून

February 26, 2009 7:13 AM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी पिंपरीपिंपरीत मनसेच्या कार्यकर्त्याचा खून झालाय. गणेश गोडांबे असं त्या कार्यकर्त्याचं नाव असून रात्री त्याचा खून करण्यात आला. या खून प्रकरणानंतर पिंपरीतील राहाटणे भागात जाळपोळ करण्यात आली. जाळपोळीत 5 बस स्टॉपही जाळण्यात आले. या खून प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 6 जणांबरोबर गणेशचं भांडण झालं होतं. पण या खुनामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. दरम्यान राहाटणे भागातल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

close