‘पाणी द्या, मत घ्या’

January 25, 2014 6:52 PM0 commentsViews: 95

25 जानेवारी : सांगलीतल्या जत पूर्व भागातील 67 गावांना म्हैशाळ योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी उमदी इथं गावकर्‍यांनी आक्रमक आंदोलन सुरू केलंय. आधी पाणी द्या मगच मत देणार असा निर्धार करून येत्या लोकसभा निवडणुकीत नोटा म्हणजेच यापैकी कुणीही नाही या अधिकाराचा वापर करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही पाठिंबा दिलाय. जत तालुका पाणी संघर्ष समिती आणि अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येतंय.

close