आदिवासी आमदारांचे राजीनामे मागे

February 26, 2009 6:32 AM0 commentsViews: 6

26 फेब्रुवारी राज्यातल्या 5 आदिवासी आमदारांनी, बोगस आदिवासींच्या प्रश्नावर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. परंतु आता या आमदारांनी राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे. बोगस आदिवासींच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षाचे पाच आदिवासी आमदार राजीनामे देणार होते. त्यात राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, काँग्रेसचे वसंत पुरके, पदमाकर वळवी, डी. एस. अहिरे आणि भाजपच्या आनंद गेडाम यांचा समावेश होता.राज्यात बोगस आदिवासींची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यापैकी 90 हजार बोगस आदिवासीं सरकारी सेवेत आहेत. या बोगस आदिवासींना काढून टाकण्याऐवजी सरकार त्यांना सेवेत कायम ठेवून अधिकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मंजुरीचा प्रस्ताव स्वत: मुख्यमंत्री अशोक चव्हाण वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडत असतात, असा आरोप राज्यातल्या सर्व 22 आदिवासी आमदारांचा होता. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर या आमदारांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

close