नॅनो कार लवकरच लॉन्च होतेय

February 26, 2009 8:38 AM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी टाटा मोटर्सची नॅनो कार आता अधिकृतरित्या येत्या 23 मार्चला लॉन्च होतेय. नॅनोचं लॉन्चिंग मुंबईत होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नॅनो कार गेल्यावर्षीच रस्त्यावर धावणार होती. पण नॅनोचा पश्चिम बंगालमधला सिंगूर प्रकल्प वादग्रस्त ठरला. अनेक आंदोलनानतर टाटा मोटार्सला सिंगूर प्रकल्प बंद करावा लागला. त्यानंतर रतन टाटांनी हा प्रकल्प गुजरातमधल्या साणंद इथं हलवला आणि नॅनोच्या प्रकल्पाला वेग मिळाला. असं असलं तरी मार्चमध्ये लॉन्च होणा-या नॅनो कार पुण्यातल्या आणि मध्यप्रदेशातल्या पंतनगरमधल्या टाटा मोटर्सच्या कारखान्यात बनवल्या गेल्या आहेत. त्यामुळे सद्यातरी अनेक ग्राहकांना नॅनोसाठी थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

close