स्तानिस्लास वावरिंकाची नदालवर मात

January 26, 2014 5:47 PM0 commentsViews: 398

Oz26 जानेवारी : स्वित्झर्लंडच्या स्टॅनिलास वावरिंकाने राफेल नदालवर मात करत ऑस्ट्रेलियनओपनवर आपलं नाव कोरलं आहे. कडव्या झुंजीनंतर जागतिक क्रमवारीत नंबर वन राफेल नदालचा धक्कादायक पराभव केला. या सामन्यात वावरिंकाने नदालचा ६-३,६-२,३-६,६-३ असा पराभव केला.

ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुरुष एकेरी गटात अव्वल मानांकित राफेल नदाल व स्टॅनिलास वावरिंका यांच्यातील अंतिम लढत रविवारी पार पडली. स्पर्धेच्या सुरुवातीपासून वावरिंकाने चमकदार खेळी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे वावरिंका व नदाल यांच्यातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र सामन्या दरम्यान नदालला दुखापतीचा सामना करावा लागला. या सामन्यात वावरिंकाने नदालचे स्वप्न भंग करत कारकिर्दीतील पहिले वहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

close