परेडमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

January 26, 2014 1:49 PM0 commentsViews: 783

ÖêÆüßÖê»ÖãÖê¾ÖÖêË26 जानेवारी :  65 प्रजासत्ताक दिनाचा आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना औरंगाबादच्या परेडमध्ये भलताच गोंधळ उडाला. झेंडा वंदनानंतर होणार्‍या परेडमध्ये लहूजी साळवे विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
मातंग समाजाला 8 टक्के आरक्षणाच्या मागणीवर शासणाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. कार्यकर्ते काळे झेंडे घेवून परेडमध्ये घुसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी लगेचच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परेड सुरळीत पार पडली.

close