अंदमानमध्ये बोट बुडाली, २१ पर्यटकांचा मृत्यू

January 26, 2014 7:32 PM0 commentsViews: 1622

andaman26 जानेवारी : अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे एक्वा मरीना ही बोट बुडून २१ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

एक्वा मरीना ही बोट सुमारे ४५ पर्यटकांना घेऊन अंदमानमधील पोर्टब्लेअरच्या दिशेने जात होती. वॉटर स्पोर्ट्स करुन हे पर्यटक परतत होते.मात्र नॉर्थ बे बेटाजवळ ही बोट पाण्यात बुडाली. यात बोटीतील सुमारे २१ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर १२ पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आल्याचे माहिती मिळली आहे.

या अपघातानंतर मदतकार्याला सुरुवात केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. या अपघातातील मृत्यूमुखींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली आहे.


ठाणे जिल्ह्यातील ४० जणांचा ग्रूप अंदमान-निकोबार येथे भटकंतीसाठी गेला होता. यातील किती जण या अपघात झालेल्या बोटीत होते याची माहिती घेत असल्याचे महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री सुरेश धस यांनी सांगितले. या अपघातातील अन्य प्रवासी हे दक्षिण भारतातील असल्याचे सांगितले जाते.

मदतीसाठी 03192 – 240137, 230178, 238881 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

close