अंदमानातील बोट दुर्घटनेमध्ये ठाण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

January 27, 2014 11:53 AM1 commentViews: 633

andaman dead family27 जानेवारी :  अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे एक्वा मरीना ही बोट बुडून २१ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ठाण्यातल्या चंद्रशेखर आणि अलका भोसेकर या दाम्पत्याचा या दुदैर्वी अपघातात मृत्यू झाला आहे. यातल्या 16 मृतांची ओळख आतापर्यंत पटली आहे. 11 जण तामिळनाडूचे आहेत तर 1 पश्चिम बंगाल आणि 1 उत्तर प्रदेशचा आहे.

25 प्रवाशी क्षमता असलेल्या ऍक्वा मरिना या बोटीत एकूण 46 पर्यटक होते तर तीन बोटीवरचे कर्मचारी होते. यातल्या 29 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यातल्या 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. बोट बुडाल्यानंतर 2 तासांनंतर मदत पोचल्याचं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आलेत. या अपघातातील मृत्यूमुखींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.  मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयाची मदत सरकारनं जाहीर केली आहे.

मदतीसाठी 03192 – 240137, 230178, 238881 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.

  • suhas bagul

    Goverment shld do the Audit on every year to Picnic Spot, as there are so many issue are there to every place we only check when acident happens.

close