हकालपट्टीनंतर बिन्नींच्या उपोषणाला सुरूवात

January 27, 2014 12:31 PM0 commentsViews: 1067

Binny27 जानेवारी : आम आदमी पार्टीच्या कारभारावर टीका करणारे पक्षाचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी काल करण्यात आली आणि विनोदकुमार बिन्नी आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर आम आदमी पार्टीविरोधात उपोषणाला बसले आहेत. ‘आप’च्या शिस्तपालन समितीने ही कारवाई करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

लक्ष्मी नगरचे आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जाहीरनाम्यातली आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरत आसून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. पक्षाविरोधी खोटी वक्तव्यं आणि पक्षाची बदनामी केल्याच्या कारणावरून ही कारवाई केल्याचं पक्षाने सांगितलं आहे. याआधी ‘आप’ने बिन्नी यांना या प्रकरणी नोटीसही बजावली होती.

close