मुंबईत बिल्डिंगवर हेलिपॅड बांधण्याची परवानगी

February 26, 2009 7:49 AM0 commentsViews: 5

26 फेब्रुवारी मुंबईमुंबई आणि उपनगरातल्या कुठल्याही बिल्डिंगवर आता कोणीही हेलिपॅड बांधू शकतो. त्यासाठी पर्यावरण, प्रदूषण आणि बांधकाम विभागाची परवानगी द्यावी लागेल. तसंच एअर ट्रॅफिक कंट्रोलची अनुमती मिळवल्यास बिल्डिंगधारक हेलिपॅड उभारू शकतो. यासंबंधीचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण हा निर्णय मुकेश अंबानी यांच्या घरावरील हेलिपॅड नियमित करण्यासाठी घेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याचबरोबर मुंबईतल्या इतरही अनेक उद्योजक, तसंच अनेक बड्या मंडळींनी आपल्या मल्टी स्टोरीज बिल्डींगच्यावर हेलिपॅडसाठी परवानगी मागितली.

close