बांगलादेशातलं बंड मोडून काढण्यासाठी लष्कराला पाचारण

February 26, 2009 10:13 AM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी बांगलादेशात बुधवारी बांगलादेश रायफल्सच्या सैनिकांनी बंड पुकारला होता. हा बंड आता शांत झाल्याचा दावा सरकारनं केला आहे. पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार बंड राजधानी ढाक्याच्या बाहेरही पसरतंय. असं असलं तरी आता हे बंड मोडून काढण्यासाठी लष्कराला बोलावण्यात आलंय. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांनी बांगलादेश रायफल्स म्हणजेच बीडीआरच्या ढाक्यातल्या हेडक्वार्टरचा ताबा घेतलाय.त्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी बंडखोरांनी तात्काळ शरण यावं. नाहीतर कडक लष्करी कारवाई करू असा इशारा दिला. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच देशाला उद्देशून भाषण केलं. पंतप्रधानांच्या इशा-यानंतरही ढाक्यात पुन्हा गोळीबार झाला. बुधवारपासून बीडीआरच्या बंडात 77 जण ठार झाले आहेत. त्यात बीडीआरच्या महासंचालकांचाही समावेश आहे. याशिवाय जवळपास 100 जवानांची अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान सकाळी बांगलादेशच्या गृहमंत्री सहारा खातून यांनी बंडखोर जवानांशी बोलणी केली.

close