नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांची मोहीम : 10 हजार पोलीस तैनात

February 26, 2009 11:37 AM0 commentsViews: 85

26 फेब्रुवारी, गडचिरोली प्रशांत कोरटकर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पंधरा पोलिसांना ठार केल्यानंतर पोलिसांनी कालपासून जोरदार शोध मोहीम राबवली आहे. यात सुमारे 10 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसांची कालपासूनही मोहीम सुरू झाली आहे.ही शोध मोहीम म्हणजे एक प्रकारचं कोंबिंग ऑपरेशच आहे. कुरखेडा तालुक्यात कुराडा म्हणून पोलीस स्टेशन आहे त्यात आंदणगावच्या पाहाडावर 400 ते 500 नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या पहाडाला पूर्णपणे वेढा दिला आहे. आतपर्यंत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या गावातल्या आदिवासींना पोलिसांनी गावातून बाहेर काढलं आहे. पोलीस नक्षलवाद्यांशी निकराची झुंज देत आहेत. गेल्या वेळेला पोलिसांकडे सर्वात कमी शस्त्रसाठा होता. पण यावेळेला गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी निघालेले पोलीस शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत. पोलिसांकडे हेलिकॅप्टरर्स आले आहेत.

close