श्रीनगरचा छोटा क्रिकेटर कासीम झगडतोय क्रिकेटसाठी

February 26, 2009 4:37 PM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी, श्रीनगर मुफ्ती इस्लाह मोहम्मद बिन कासीम याला जम्मू काश्मीरच्या अंडर – 16 क्रिकेट टीमचं नेतृत्व करायची संधी मिळालीय. तोसुद्धा या संधीचं सोनं करण्यासाठी उत्सुक आहे. पण त्याची आईच त्याच्या मार्गात अडचण ठरलीय. त्याची आई आसिया अंद्राबी ही कट्टरवादी महिला इस्लामी संघटना दुख्तरन-ए-मिल्लत याची प्रमुख आहे. आणि आपल्या मुलानं क्रिकेट खेळण्यापेक्षा धार्मिक चर्चासत्रांत भाग घ्यावा अशी तिची इच्छा आहे. मोहम्मद बिन कासीमचं स्वप्न सत्यात उतरलंय. विजय मर्चंट ट्रॉफीसाठी जम्मू आणि काश्मीर क्रिकेटच्या अंडर – 16 टीममध्ये त्याची निवड झालीये. पण त्यात खेळायला कासीमच्या आईनं परवानगी नाकारलीय. त्याची आई आसिया अंद्राबी ही कट्टरवादी दुख्तरन-ए-मिल्लतची प्रमुख आहे. " आम्ही ज्या देशाविरुद्ध लढतोय, त्या देशाच्या बाजूनं खेळायला देणार नसल्याचं अंद्राबीनं आपल्या मुलाला बजावलंय. त्याऐवजी कासीमनं शिक्षण संपल्यानंतर धार्मिक चर्चासत्रात भाग घ्यावा, असं कासीमची आई अंद्राबीचं म्हणणं आहे. दोन महिन्यांचा असतानाच कासीमनं आपल्या आईसोबत जेलची हवा खाल्लीय. कासीमचे वडील मुहम्मद कासीम फुक्तू अतिरेकी संघटनेचे कमांडर आहेत. फुक्तू 1994 पासून जेलमध्ये आहेत. कासीमनं आपल्या पावलावर पाऊल टाकावं, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे. पण कासीमला मात्र आलेली संधी सोडायची नाहीय. क्रिकेट हा त्याचा ध्यास आहे आणि त्यासाठी तो आपल्या आईवडलांशी झगडतोय.

close