राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढतोय

February 26, 2009 4:42 PM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी, पणजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढत असल्याचं दिसतंय. आता राष्ट्रवादीनं काँग्रेसवर थेट टीका करण्यास सुरूवात केलीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी या मुखपत्रातून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आलीय. ताकद दोन प्रकारची असते. एक असली आणि दुसरी नकली. काँग्रेसची ताकद ही नकली आहे, अशी थेट टीका राष्टवादीच्या संपादकीयमध्ये करण्यात आलीये. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर, सोनिया गांधीची सद्दी संपेल, असा इशाराही देण्यात आलाय. जागा वाटपाच्या चर्चेची शेवटची फेरी शुक्रवारी 27 फेब्‌ुवारीला मुंबईत होणार आहे. त्यापुर्वीच राष्ट्रवादीतून झालेल्या या टीकेमुुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काँग्रेसला इशारा दिलाय. आघाडीसाठी भाजपशिवाय आणखीही पर्याय खुले आहेत. असं ते म्हणालेत.

close