हे षड्‌यंत्र पण, मी संपणार नाही -अशोक चव्हाण

January 27, 2014 8:00 PM0 commentsViews: 969

Image img_145602_ashokchavahan3245.jpg_240x180.jpg27 जानेवारी :आदर्श सोसायटी घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रिपद गमवावं लागलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच केलं.

मला संपवण्याचं षड्‌यंत्र सुरू आहे. पण, मी संपणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या विरोधकांवर टीका केली. माझ्याविरुद्ध होत असलेल्या आरोपांमागे वेगळेच चेहरे असल्याचंही ते म्हणाले.

त्यांचा रोख पक्षांतर्गत विरोधकांकडे होता. आदर्श प्रकरणामध्ये सीबीआयनं जे आरोपपत्र दाखल केलं. त्यात तेरावे आरोपी म्हणून अशोक चव्हाण यांचं नाव होतं. त्यावेळी अशोक चव्हाण विरोधक दिल्लीतल्या काही काँग्रेस नेत्यांनी दबाव आणल्याची चर्चा होती. त्याच अनुषंगानं चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जातंय.

close