भाजपकडून राज्यसभेसाठी आठवलेंना उमेदवारी

January 27, 2014 9:04 PM2 commentsViews: 1079

ramdas athavale 427 जानेवारी : भाजपकडून राज्यसभेसाठी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आज (सोमवारी) दिल्लीत भाजपनं ही घोषणा केली. मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश मुख्यालयात गोपीनाथ मुंडे यांनी रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करत असल्याचं जाहीर केलं. यावेळी रामदास आठवले ही हजर होते.

आठवलेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा ऐतिहासिक, जसे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. त्या इतिहासाची पुनरावृती महायुती करत आहे असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. तसंच आरपीआय आता महायुतीबरोबर एनडीएचाही घटक पक्ष झाल्याचंही मुंडे यांनी म्हटलंय.

उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. दरम्यान, रामदास आठवले यांची राज्यसभेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानं आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. औरंगाबादेतील क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरवले.या प्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Dilip Ujagare

    Well began is half done. RPI to ensure the formula similarly for forthcoming Loksabha & then State Legislative assembly & Council polls.

    It will then be proved that the Formula is as agreed during nexus with these Caste based parties is correct or wrong. The Caste bias cannot be judged by this decision of declaring Athawale as Rajya Sabha Member. RPI needs to keep its AASMITA at the topmost priority. They need to get proper representation up to the last tier of the PANCHAYATI RAJ SYSTEM.

  • Nachiket Adhunik

    एकतर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य नव्हते आणि घटना समितीमध्ये ते बंगालमधून जरी निवडून गेले असले तरी ते श्यामाप्रसादांच्या पाठिंब्याने नव्हे तर ज्येष्ठ दलित नेते जोगेन्द्रनाथ मंडल यांच्या पुढाकाराने! इतिहास असे तो कच्चा आणि संघी नसे तो सच्चा

close