गोव्यातल्या मांडवी नदीलगतचे कसिनो हलवणार

February 26, 2009 4:49 PM0 commentsViews: 2

26 फेब्रुवारी, पणजी लोकांच्या भावनांची दखल घेत गोवा सरकारनं अखेर मांडवी नदीकिनार्‍यावरचे कॅसिनो दुसरीकडं हलवण्याचा निर्णय घेतलाय. मांडवी नदीत सध्या सहा कॅसिनो आहेत. 15 दिवसांत हे कॅसिनो काढण्यात येणार आहेत. पणजी शहराच्या हद्दीच्या बाहेर हे कॅसिनो हलवण्यात येतील. गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर सध्या कॅसिनोंची प्रचंड झालीय. ते कॅसिनो काढण्यासाठी नागरिक आणि विरोधी पक्षांचा सरकारवर प्रचंड दबाव होता. 15 मार्चपूर्वी मांडवी नदीतून कॅसिनो काढले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

close