राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

January 27, 2014 11:33 PM1 commentViews: 1967

ruyurf427 जानेवारी : राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या सात जागांसाठी 7 फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. या सात जागांसाठी सहा उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

 

कारण, महायुतीच्या वतीने भाजपच्या जागेवरून आरपीआय नेते रामदास आठवले अर्ज भरणार आहेत. तर शिवसेनेकडून राजकुमार धूत यांनी अर्ज भरलाय. मनसेच्या 11 मतांना महत्त्व मिळू नये म्हणून शिवसेनेनं दुसरा उमेदवार द्यायचा नाही, हे जवळजवळ निश्चित केलं आहे.

 

तर सोमवारी सकाळीच काँग्रेसकडून मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांनी अर्ज भरले आहेत. तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजिद मेमन यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे सातव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार संजय काकडे यांच्या पदरात काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांबरोबरच इतर छोटे-मोठे पक्ष आणि सेना-भाजपची उरलेली मतं मिळण्याची दाट शक्यता आहे.

 • DT

  शरद पवार यांच्या पक्षाकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार माजिद मेमन ह्याने अर्ज भरला.
  तर कोण हा Majid Memon ..

  1.1993 च्या Bomb Blast मधे आहो रात्र कष्ट आणि तपास करून पकडलेल्या अतिरेक्याना सोडवणारा हाच तो वकील मजिद मेमन
  2. 2002 घाटकोपर बॉम्ब ब्लस्ट मधिल अतिरेक्याना सोडवणारा हाच तो वकील.
  3. Sanjay datt is neither a traitor nor a terrorist म्हणून त्याची केस लढणारा हाच माणूस.
  4. ह्याच्या अंडर ट्रेनिंग घेणारा वकील शहीद आज़मी ह्याचे काम पण POTA(Prevention of Terrorism Act, 2002) अंडर पकडलेल्या अतिरेक्यांची सुटका करणे.
  ..असा हा काळा वकील(बोका) आता राज्यसभेवर पाठवतायेत आपल्याच शिवरायांच्या महाराष्ट्रातले भावना शून्य लोक…राजकारण लाज सोडून द्यायला लावतो ते खरय…आणि मीडीया चे हे सर्व झाकून ठेवल्याबद्दल विशेष आभार.. !!

close