न्यूझीलंड समोर 279 रन्सचं लक्ष्य

January 28, 2014 9:59 AM0 commentsViews: 300

INDvsNZ4ODI28 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंडमध्ये चौथी वन डे मॉच आज हॅमिल्टनमध्ये सुरू आहे. भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊन न्यूझीलंड समोर 278 रन्सचं लक्ष ठेवलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वन डेत भारताची टॉप ऑर्डर कोसळली. ओपनिंगला आलेला विराट कोहली अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला तर अजिंक्य रहाणेनंही 3 रन्सवर माघार पतकरली. या दौर्‍यात पहिलीच मॅच खेळणारा अंबाती रायडू 37 रन्सवर आऊट झाला. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोणीने प्रत्येकी 79 रन्सवर केले तर रवींद्र जडेजाने 61 रन्स केले. तर कॅप्टन धोणी आणि रवींद्र जडेजानं सहाव्या विकेटसाठी 127 रन्सची पार्टनरशिप करत समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. मॅचच्या आखेरीस भारताने 5 विकेट गमावत न्यूझीलंडसमोर 279 रन्सचं टार्गेट ठेवलं पम याला उत्तर देताना न्यूझीलंडने 1 विकेटवर 54 रन्स केले आहे.

close