रेपो रेट 0.25 टक्क्यांची वाढ, गृहकर्ज महागणार

January 28, 2014 12:55 PM0 commentsViews: 177

Image img_171842_rbi6_240x180.jpg28 जानेवारी :  रिझर्व्ह बॅकेचे तिमाही पतधोरण जाहीर झाले असून रेपो व रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली असून त्यामुळे गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.

रेपो रेटमध्ये(रिझर्व्ह बॅकेकडून इतर बँका ज्या दराने पैसे घेतात) पाव टक्क्याने वाढ होऊन तो ७.७५ वरून ८ टक्क्यांवर पोचला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्येही (रिझर्व्ह बॅक इतर बॅकांकडून ज्या दराने पैसे घेते) पाव टक्क्याची वाढ झाली असून तो ६.७५ वरून ७ टक्क्यांवर पोचला आहे.

दरम्यान आरबीआयने कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) मध्ये कोणताही बदल केलेला नाही.  रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाचा फटका गृहकर्जांना बसण्याची दाट शक्‍यता आहे.

दरम्यान, महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केल्याचे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. तसेच यापुढे भविष्यात रेपो रेट कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

close