तामिळनाडूतल्या चार पोलीस अधिका-यांचं निलंबन

February 26, 2009 4:58 PM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी, तामिळनाडू मद्रास हायकोर्टात गेल्या आठवड्यात पोलीस आणि वकील यांच्यात चकमक झाली होती. त्या चकमकीतल्या चार पोलीस अधिकार्‍यांची बदली करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं तामिळनाडू सरकारला दिलेत. त्यात एक जॉईंट कमिशनर आणि तीन डीसीपींचा समावेश आहे. मद्रास हायकोर्टात गेल्या आठवड्यात पोलीस आणि वकील यांच्यात चकमक झाली होती. त्यावेळी पोलिसांना हायकोर्टात जाण्याची परवानगी दिल्याचा आरोप या पोलीस अधिकार्‍यांवर आहे. या हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत. माजी न्यायाधीश श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षेतेखालची समिती ही चौकशी करणार आहे. दरम्यान, वकिलांचा संप मात्र अजूनही सुरूच आहे. या समितीला दोन आठवड्याच्या आत चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांनी दिलेत. कोर्टाच्या आवारात पोलिसांना शिरण्याचे आदेश देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरुध्द कडक कारवाई करायलाही सरन्यायाधीशांनी सांगितलंय. गेल्या आठवड्यात मद्रास हायकोर्टाच्या आवारात वकील आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतरच्या हिसांचारात वकिलांनी एक पोलीस स्टेशनही जाळलं होतं.

close