राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, आठवले,काकडे राज्यसभेवर !

January 28, 2014 8:25 PM0 commentsViews: 2920

ruyurf428 जानेवारी : राज्यसभेच्या राज्यातल्या सात जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत सात जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे सातही उमेदवारांची राज्यसभेवरची निवड निश्चित झाली आहे. पण उद्या (बुधवारी) अर्जाची छाननी होऊन शनिवारी अधिकृत घोषणा होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मुरली देवरा, हुसेन दलवाई, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राजकुमार धूत, आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अपक्ष उमेदवार संजय काकडे हे सात जण आता खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत. महायुतीच्या वतीने भाजपच्या जागेवरून आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आज अर्ज भरला. तर शिवसेनेकडून राजकुमार धूत यांनी अर्ज भरलाय. मनसेच्या 11 मतांना महत्त्व मिळू नये म्हणून शिवसेनेनं दुसरा उमेदवार द्यायचा नाही अशी रणनीती आखली होती.

तर दुसरीकडे काँग्रेसकडून मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांनी अर्ज भरले आहेत. तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजिद मेमन यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे सातव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार संजय काकडे यांच्या पदरात काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांबरोबरच इतर छोटे-मोठे पक्ष आणि सेना-भाजपची उरलेली मतं मिळाली आहे. विशेष म्हणजे काकडे यांनी राज्यसभेच्या जागेसाठी 3 वर्ष प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभवावरुन राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल असे स्पष्ट संकेत दिले होते आणि पवारांचा शब्द खरा ठरला. सातही उमेदवार आता राज्यसभेवर निवड झाली असून आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतिक्षा आहे.

close