गुंडाराज, पोलिसांसमोरच रिव्हॉल्वर रोखून 65 लाखांचे चेक लिहून घेतले

January 28, 2014 8:04 PM1 commentViews: 3475

nagupr gundagardi28 जानेवारी : नागपूरमध्ये कुख्यात गुंड संतोष आंबेकरनं चक्क अंबाझरी पोलीस ठाण्यातच बिल्डरवर रिव्हॉल्वर रोखून 65 लाखांचे चेक लिहून घेतल्याने खळबळ उडालीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल वासनिक या व्यक्तीची प्रॉपर्टी बिल्डर जितेंद्र चव्हाण यांनी विकत घेतली होती. सर्व पैसे देवूनही राहुलची पत्नी पुनम वासनिक ही या प्रॉपर्टीचा ताबा सोडत नव्हती. पुनमनं हे प्रकरण गुंड संतोष आंबेकरच्या कानावर घातलं. यानंतर आंबेकर आणि त्याच्या साथीदारांनी चव्हाण यांना धमकवायला सुरूवात केली.

संतोष आंबेकरला मोक्का न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. पण तो तीन वेळा तो मोक्का मधून निर्दोष बाहेर आला. आंबेकर सध्या अनंत सोवनी खून प्रकरणात जामिनावर आहे. खंडणी मागणे आणि प्रॉपर्टीसाठी लोकांना धमकावणे ह्यासाठी आंबेकर शहरात चर्चेत असतो. जितेंद्र चव्हाण या बिल्डरला संतोष आंबेकरने 14 डिसेंबरला अंबाझरी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर रिव्हॉल्वरने धमकावले आणि मारहाणही केली.

काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या घरावरही आंबेकरच्याच गुंडांनी हल्ला केला होता. राहुल वासनिक या व्यक्तीची प्रापर्टी बिल्डर जितेंद्र चव्हाण यांनी विकत घेतली होती. सर्व पैसे देवूनही राहुलची पत्नी पुनम वासनिक ही या प्रॉपर्टीचा ताबा सोडत नव्हती. यातूनच पुनम हे प्रकरण डॉन संतोष आंबेकर याच्याकडे घेवून गेली. आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने चव्हाण यांना धमकावले. या प्रकरणी संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संतोष आंबेकरने बिल्डरला पोलीस ठाण्यातच धमकावल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. संतोष आंबेकरचे राजकीय नेत्यांशी संबध असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. बिल्डरला धमकावण्याच्या प्रकरणात संतोष आंबेकरला सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. आंबेकरवर पुन्हा मोक्का लावण्यासंदर्भात पोलीस विचारही करत आहेत. पण संतोष आंबेकरची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी योग्य पावले उचलण्याची गरज आहे.

  • Ek nagapurkar

    संतोष आंबेकर ह्या गुंडाला कॉंग्रेसचा मंत्री नितीन राउत चा छुपा पाठींबा आहे..
    म्हणूनच हा संतोष हे धाडस पोलिस स्टेशन मध्ये करू शकला

close