मुंबई-अहमदाबाद हायवेवर अपघात; 8 जण ठार

January 29, 2014 8:35 AM0 commentsViews: 986

accident29 जानेवारी :  मुंबई-अहमदाबाद हायवेवर आज पहाटे पावणे दोनच्या सुमारास एका लक्झरी बस आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्याहुन अदमदाबादकडे जात असलेली लक्झरी बसने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या टँकरची धडक दिली. ठाणे जिल्हातल्या मनोरजवळच्या कुडे गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, धडक लागल्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. यावेळी बसच्या मागे येत असलेल्या कारही बसला धडकली व ती कारही जळून खाक झाली आहे.
जखमींना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद हायवेवरची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

close