रणजी फायनल: महाराष्ट्राने जिंकला टॉस, पहिली बॅटिंग

January 29, 2014 10:50 AM0 commentsViews: 617

vijay-zol_1101pti_63029 जानेवारी : महाराष्ट्राची क्रिकेट टीम इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. हैदराबादमध्ये आजपासून रणजी स्पर्धेच्या फायनलला सुरुवात झाली आहे. यावर्षी फायनलमध्ये महाराष्ट्राचा मुकाबला रंगणार आहे टीम कर्नाटका सोबत. महाराष्ट्राने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आधी 1939-40 आणि 1940-41 मध्ये महाराष्ट्राने रणजी स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी दिग्गज टीम्सना पराभवाची धूळ चारत महाराष्ट्राने रणजीच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.

पहिल्यांदा मुंबईचा मुंबईत पराभव करत, आणि नंतर बंगालचा धुव्वा उडवत महाराष्ट्राने या स्पर्धेत विजेतेपदावर दावा भक्कम केला आहे.

महाराष्ट्राचे बॅट्समन आणि बॉलर्स सर्वजण यावर्षी उत्तम कामगिरी करता आहेत. मोठा स्कोर उभारणे असो किंवा रन्सचा पाठलाग करणं असो, महाराष्ट्राची कामगिरी यावेळी अव्वल राहिली आहे. त्यामुळे टीम महाराष्ट्राकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत.

close