इस्थरचे मारेकरी अजूनही मोकाटच!

January 29, 2014 9:58 AM0 commentsViews: 841

Esther_Anuhya_facebook_pic_36029 जानेवारी :  मुंबईत इस्थर अनूह्या या तरूणीचा मृतदेह सापडून दोन आठवडे उलटले तरी तपास दिशाहीनच आहे. ज्या 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्यांना पोलिसांनी सोडून दिलं आहे. इस्थरचा मृतदेह मुंबईतल्या भांडूप परिसरात सापडला होता. या चार जणांच्या कॉल रेकॉर्डस् वरून त्यावेळी ते चौघे भांडूप परिसरात उपस्थित नव्हते, असं सिद्ध झालं आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत नसल्याचा आरोप इस्थरच्या कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान, इस्थर अनुह्या हिच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स (एलटीटी) स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. मुंबई तेलगु समिती आणि तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली नेहरूनगर ते एलटीटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात इस्थरचे नातेवाईकही सहभागी झाले होते.

5 जानेवारीला इस्टर अनुह्या ही युवती एल.टी.टी रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह 17 तारखेला भांडूपजवळच्या कांजुरमार्ग हायवेवर सापडला होता. पण अजूनही मारेकरी मोकाटच आहेत.

close