हिंगोलीच्या चिमुकलीची दहाव्या दिवशीही मृत्यूशी झुंज सुरू!

January 29, 2014 2:28 PM0 commentsViews: 1617

Image img_228412_delhigangrape_240x180_300x255.jpg29 जानेवारी : बालकांविरोधात होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. महिलांवरचे लैगिंक अत्याचार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. एवढं सगळं होऊनही अत्याचार मात्र सुरुच आहेत. हिंगोली जिल्ह्यातही असाच एका सुन्न करणारा प्रकार घडलाय. मूकबधीर शाळेत शिकणार्‍या 7 वर्षांच्या गतीमंद मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय. यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीवर सध्या नागपुरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पाहूया, गेले 10 दिवस मृत्यूशी लढा देणार्‍या या मुलीची कहाणी.

दिल्लीत निर्भयावर अमानुष बलात्कार झाला आणि सारा देश तिच्यासाठी एकत्र आला. याच घटनेची आठवण यावी, अशी घटना हिंगोलीतल्या शेंदा तालुक्यातल्या वाढोणा गावात घडलीय.

  • शरदचंद्र पवार मूकबधीर शाळेत एका 7 वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालाय.
  • बलात्काराआधी आठवडाभर पूर्वीच या मुलीनं या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतला.
  • 13 जानेवारीला शाळेतल्या कर्मचार्‍यांनी तिची तब्येत बरी नसल्याचं सांगत तिला घरी आणून सोडलं.
  • पण, घरी आणल्यावर काही वेळातच तिला रक्तस्राव होऊ लागला.
  • डॉक्टरांकडे गेल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

7 वर्षांची ही मूकबधीर चिमुकली सध्या नागपूरच्या सरकारी हॉस्पिटलमधल्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देतेय. तिच्या गुप्तांगांना आणि आतड्यांना जबर मार बसलाय. या प्रकरणी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलनही केलं. पण, 1 शिक्षक, 1 शिपाई आणि एका केअर टेकरला अटक करण्यापलिकडे अजून काहीही कारवाई झालेली नाही.

महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी या मुलीवर अकोल्यात उपचार केले आणि तिच्या पुढच्या उपचारांसाठी तिला नागपूरला पाठवलं…

खासदार सुप्रिया सुळे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतली. cut this vo पण, अशा घटना रोखण्यासाठी समाज परिवर्तन हाच उपाय असल्याचे तात्विक सल्ले देण्यापलिकडे त्यांनीही काही केलेलं नाही.

विशेष म्हणजे ज्या शाळेत हे घडलं त्या शाळेचा संस्थाचालक हा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा वाशिमचा बडा कार्यकर्ता आहे. या प्रकरणात अत्यंत बेजबाबदारपणे वागणारे संस्थाचालक आणि मुख्यध्यापक यांना अटक कधी होणार आणि मूकबधीर मुलींच्या सुरक्षेची काळजी सरकार घेणार का, असे असंख्य प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण झाले आहेत…

 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
- शरदचंद्र पवार मूकबधीर शाळेत 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
- आठवडाभरापूर्वीच पहिल्या वर्गात घेतला होता प्रवेश
- 14 जानेवारी : शिपायानं मुलीला घरी आणून सोडलं
- काही वेळातच तिला रक्तस्राव होऊ लागला

या पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. तिच्यावर आज सकाळी एक ऑपरेशन करण्यात आलं त्यानंतर तिचा रक्तस्त्राव आता थांबला असल्याची माहिती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन राजाराम पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात या मुलीला मदत करणार्‍या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी मुलींचे कपडे आणि त्यांच्या बाहेर जाण्यावरून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र यावर त्यांनी माफीही मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

close