नगरसेवकाने पिस्तूल आणल्या प्रकरणावर महापालिकेत चर्चा

February 26, 2009 3:41 PM0 commentsViews: 1

26 फेब्रुवारी मुंबईकाँग्रेसच्या नगरसेवकानं सभागृहात पिस्तूल आणल्याच्या प्रकरणावर मुंबई महापालिकेत चर्चा झाली. आयबीएन-लोकमतनं हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. कामकाजाच्या सुरुवातीला सभागृह नेते सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून या नगरसेवकाचं पद रद्द करा अशी मागणी केली. त्यावर 12 नगरसेवकांनी यावर मतं मांडली. तब्बल अडीच तास ही चर्चा सुरू होती. त्यानंतर मंत्रालयाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत शस्त्र ठेवण्यासाठी लॉकर्स नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. तर हे लॉकर्स असावेत, यासाठी लवकरच प्रस्ताव आणू, असं ऍडिशनल कमिशनर माधव सांगळे यांनी सांगितलं. आयुक्ताच्या अहवालानंतर संबंधित नगरसेवक दोषी आढळला तर महापौर त्याच्यावर कारवाई करतील.

close