गुंड संतोष आंबेकरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

January 29, 2014 4:31 PM0 commentsViews: 538

nagupr gundagardi28 जानेवारी : बिल्डर जितेंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस ठाण्यातच पिस्तुल रोखून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुंड संतोष आंबेकर आणि त्याच्या पाच सहकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सेशन कोर्टाने दिले आहे.

 

हे सर्व सहा आरोपी तात्पुरत्या अटकपूर्व जामिनावर असून त्यांचा जामीन कायम होण्यासंदर्भात आज सुनावणी होणार आहे. अटकेच्या भीतीने संतोष आंबेकर आणि सहकारी आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. दरम्यान, आंबेकर याची दहशत इतकी आहे की तक्रारदार बिल्डरचं वकीलपत्र घ्यायला कोणता वकील तयार नाहीय.

close