टोल वसुली पूर्ण होऊनही लूट सुरूच !

January 29, 2014 2:29 PM1 commentViews: 359

435 parbhani toll news29 जानेवारी : राज्यात टोलचा प्रश्न पेटलाय. तर दुसरीकडे परभणीत मात्र उड्डाणपूलावर झालेला खर्च दुपटीने वसूल झाला तरी टोलवसुली मात्र सुरूच आहे. 11 कोटींच्या उड्डाणपुलासाठी तब्बल 12 वर्ष टोलवसुली सुरू असल्याचं उघड झालंय.

परभणी शहरातला हा एकमेव पूल 1999 मध्ये बांधण्यात आला. 3 वर्षांत हा पूल तयार झाला. त्यासाठी 4 टोलनाके बांधले. टोल आंदोलनात यातले गंगाखेडचा टोलनाका वगळता 3 टोलनाके बंद करण्यात आले आहेत.

जवळपास दुपटीने खर्च वसूल झाला तरी इथल्या उड्डाणपूलावर साधे लाईटही लावण्यात आलेले नाही की कोणत्याही सुविधा नागरिकांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हाही टोलनाका बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टोलवसुली कशासाठी ?

  • 1999 – उड्डाणपूल मंजूर
  • 2002- पूल बांधून तयार
  • एकूण खर्च- 11 कोटी 20 लाख
  • पाथरी, जिंतूर, वसमत, गंगाखेडमध्ये टोलनाके सुरू
  • दरवर्षी 1 कोटी 65 लाख टोलवसुली
  • 12 वर्ष टोलवसुली सुरूच

  • nikhil

    mala saanga ki raj thackeray kay chukich bolle? itki fasavnuk jhalywarhi hijadyasarkhe talya wajvat basaych?

close