अंगणवाडी सेविकांचं आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

January 30, 2014 8:46 AM0 commentsViews: 249

363346 anganwadi 430 जानेवारी :  राज्यभरातल्या तब्बल 3 लाखहुन जास्त अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्वासन देऊनही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकारने पाठ फिरवत असून आजपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

राज्यभरात अंगणवाडी सेविकांची निदर्शनं सुरू आहेत. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानात आंदोलन करताहेत. या आंदोलकांची शिष्टमंडळाची महिला व बालविकास कल्याणमंत्री वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली होती. मात्र या बैठकीत सरकारकडून दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवले आहे.

आज राष्ट्रवादी भवन इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनता दरबार सुरू आहे. इथेच अंगणवाडी सेविका त्यांची भेट घेणार आहेत.

close