खुशखबर! 2 फेब्रुवारीपासून मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत

January 30, 2014 4:30 PM0 commentsViews: 1671

Image img_202952_monorailmumbai_240x180.jpg30 जानेवारी :   ट्रॅफिक जामने वैतागलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. 2 फेब्रुवारीपासून मुंबईत मोनोरेल धावणार आहे. 1 फेब्रुवारीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे तर 2 फेब्रुवारीपासून मुंबकरांना मोनोरेलमधून प्रत्यक्ष प्रवास करता येणार आहे. सुरुवातीला सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोनोरेल धावणार आहे.

 

 

मोनो रेल्वेचा पहिला टप्पा

– पहिल्या टप्प्यात एकूण अंतर 9 कि.मी.
– प्रत्येक 1 किलोमीटरवर स्टेशन
– पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर
– पहिल्या टप्प्याचा एकूण खर्च 1500 कोटी
– तिकिटांचे दर 5 ते 11 रुपये

close