राहुल गांधींविरोधात दिल्लीत निदर्शन

January 30, 2014 2:05 PM0 commentsViews: 430

sikh protest30 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 1984च्या शीख दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटी आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शन केली. दिल्लीच्या 24 अकबर रोडवर आज हा मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येते आहेत.

शीख संघटनेतील सदस्यांनी गुरूवारी सकाळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (एआयसीसी) च्या कार्यालयाबाहेर काळे झेंडे, सायकलचे टायर्स आणि पोस्टर्स घेऊन आंदोलन केले, तसेच जोरदार घोषणाही दिल्या.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ साली झालेल्या दंगलीत काही काँग्रेस नेत्यांचा सहभाग असू शकतो, असे म्हटले होते. तसेच ही दंगल रोखण्यासाठी काँग्रेसने ठोस पावले उचलली होती असेही त्यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर शीख संघटनेतील सदस्यांनी त्या नेत्यांची नावे जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, एआयसीसीच्या कार्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

close