2009च्या बनावट नोटांप्रकरणी 6 जणांना जन्मठेप

January 30, 2014 3:11 PM0 commentsViews: 332

currency30 जानेवारी :  2009 साली बोगस नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या सहा जणांना विशेष कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या बनावट नोटा भारतातल्या अनेक शहरांमध्ये आढळल्या होत्या. या नोट्या पाकिस्तानातूनच आल्याचे कोर्टात स्पष्ट झाले. याप्रकरणी कोर्टाने 6 जणांना जन्मठेप सुनावली आहे. बनावट नोटांप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे.

2009 साली एटीएसच्या अधिकार्‍यांनी माझगाव इथून 4 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे तपासात आणखी 2 जणांचा संबंध असल्याच उघड झालं यानंतर त्या दोघांनाही एटीएसच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. बोगस नोटांच प्रकरण देशभर सुरु असल्याने या प्रकरणाचा तपास नॅशनल इन्वेस्टिगेंटींग एजन्सी यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. विशेष कोर्टाचे न्यायमुर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वच्या सर्व सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

close