आनंदला पराभवाचा धक्का

February 26, 2009 6:00 PM0 commentsViews: 5

26 फेब्रुवारी लिनारेस चेस चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का बसला. सहाव्या राऊंडमध्ये नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसननं आनंदला पराभूत केलं. कार्लसननं क्लासिकल गेममध्ये तब्बल 77 चालीत आनंदचा पराभव केला. या पराभवानंतर आता आनंद पॉईन्ट टेबलवर संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय. त्याचबरोबर हा पराभव म्हणजे गेल्या सहा राऊंड्समधील आनंदचा दुसरा पराभव आहे. पण लिनोरेस चॅम्पियनशिपचा आनंद गतविजेता आहे. त्यामुळे जर त्याला आपलं टायटल राखायचं असेल तर पुढील आठ राऊंड्समध्ये त्याला त्याचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच आनंदनं बॉन इथे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता.

close