अखेर अनुदानित सिलेंडरची संख्या 9 हून 12 वर

January 30, 2014 4:34 PM1 commentViews: 1265

Image img_228272_gascylender34_240x180.jpg30 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने घोषणांचा सपाटा लावलाय. गेल्या वर्षभरापासून रखडलेला अनुदानित 9 सिलेंडरचा प्रश्न आता मार्गी लागला असून 9 सिलेंडरची संख्या 12 करण्यात आली आहे. अनुदानित सिलेंडर्सची संख्या 9 वरून 12 करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. यामुळे सरकारच्या तिजोरीवर अनुदानापोटी 80 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. 1 फेब्रुवारीपासून हा निर्णय अमलात येणार आहे.

विशेष म्हणजे 12 सिलेंडर देण्यात यावे अशी मागणी खुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्याकडे काँग्रेसच्या अधिवेशनात केली होती. राहुल गांधी यांनी मागणी ‘सर आँखो पर..’ म्हणत केंद्र सरकार तातडीने कामाला लागले आणि आज (गुरुवारी) अनुदानित सिलिंडरची संख्या 9 वरून 12 वर करण्याचा महत्वपूर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पण दुसरीकडे घरगुती सिलेंडरवरची सबसिडी बँकेत जमा करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, LPGचं अनुदान आधार कार्डाच्या सहाय्यानं थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय

  • Sandip Bhoi

    मतदाना पुरते आमिश्

close