ना. धों. महानोर जनस्थान पुरस्कारानं सन्मानित

February 27, 2009 2:41 PM0 commentsViews: 17

27 फेब्रुवारी दीप्ती राऊत, निरंजन टकले हिरव्या बोलीचा शब्द' होत मराठी कवितेचं शिवार आबदानी करणारे कवी, लेखक, शेतकरी आणि कार्यकर्ता नामदेव धोंडो अर्थातच ना. धों. महानोर यंदाच्या जनस्थान पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतफेर् दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे ते दहावे मानकरी असून कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला नाशिकमध्ये समारंभपूर्वक तो प्रदान केला गेला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जब्बार पटेल आणि रामदास भटकळ यांच्या हस्ते ना. धों.चा जनस्तान पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी त्यांच्या हयातीतच जनस्थान पुरस्काराची रुजवात केली होती. या पुरस्काराच्या निवडीसाठी प्रबंधक समितीकडून राज्यभरातील जाणकरांकडून नावांची शिफारस मागवण्यात येते. त्यातून निवड समिती एक नाव निश्चित करते. एक वर्षाआड दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराने मराठी साहित्यातील दिग्गजांना गौरवण्याची परंपरा १९९१ सालापासून सुरू आहे. आजपावेतो विजय तेंडुलकर (१९९१), विं. दा. करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगुळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५) आणि बाबुराव बागुल (२००७) यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा पुण्यात द. भि. कुलकणीर् यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शनिवारी पुण्यात महानोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत डॉ. यशवंत पाठक, सदानंद मोरे, निशिकांत ठकार, अंबरीश मिश्र, अरुणा ढेरे, सुधीर रसाळ यांचा समावेश होता. मात्र, पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्याचे अद्याप ठरले नसल्याचे सांगण्यात आले.

close