कुष्ठरोगी वाढले, महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर

January 30, 2014 10:15 PM0 commentsViews: 288

maha kushta30 जानेवारी : कुष्ठरोग निवारणाकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं समोर आलंय. राज्यभरात कुष्ठरोग्यांची संख्या वाढत असून एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात एप्रिल 2012 ते मार्च 2013 पर्यंत जवळपास अठरा हजार 715 कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे.

त्यामुळे कुष्ठरोगाचं निवारण होणं आटोक्यात आलं असल्याचा सरकारचा दावा फोलच ठरला आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनाच्या निमित्ताने राज्यातील कुष्ठरोग रुग्णांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ही माहिती पुढे आली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यासाठी कुष्ठरोग खात्याच्या विभागाची स्वतंत्र यंत्रणा होती.

मात्र सरकारने ही यंत्रणा मोडीत काढत कुष्ठरोग निवारणाचं काम आरोग्य सेविकांवर सोपवले होते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देखिल देण्यात आलंं. मात्र कुष्ठरुग्ण शोधण्याच्या कामापासून आरोग्य सेवकांनी काढता पाय घेतला. आणि त्यामुळेच आता ही संख्या वाढत चालली असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्यावर्षी कुष्ठरोग्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे.

 सर्वाधिक कुष्ठरोगी असणारी राज्यं (2012-13)

 • उत्तर प्रदेश         24,222
 • बिहार                22,001
 • महाराष्ट्र             18,715
 • प.बंगाल             11,683
 • गुजरात                 9,010    

कुष्ठरोग्यांच्या संख्येत वाढ

 • ठाणे 2757
 • चंद्रपूर 1293
 • नाशिक 1259
 • जळगाव 925
 • पुणे 777
 • नागपूर 764
 • बृहन्मुंबई 435

 

close